Health: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक खेळाडू आणि सेलिब्रेटी न कंटाळता अनेक महिने एकाच प्रकारचे अन्न खातात असं नुकतंच अनुष्का शर्मांनी एका मुलाखतीतही म्हटलं होतं. यानंतर विराट आणि अनुष्काच्या डायट विषयीच्या अनेक पोस्ट समाज माध्यमांवर फिरत आहेत. मोनोट्रॉफीक डाएटचा जीवनशैलीत अवलंब केल्याचं तसेच मी सलग सहा महिने नाश्त्यात इडली सांबार खाल्ला आहे, असेही अनुष्काने सांगितले होते. अनुष्कानं सांगितलं आहे. पण नक्की या डायटने आरोग्यात काही फरक पडतो का? वजन कमी करण्यासाठी किंवा दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यासाठी हे डायट फायद्याचे ठरतं का? मोनोट्राफिक डायट म्हणजे काय? जाणून घेऊया
मोनोट्राफिक डायट आहे तरी काय?
मोनो ट्राफिक डायट म्हणजे एकाच प्रकारचं अन्न सलग काही महिने खाणे. समाज माध्यमांवर तुम्ही कदाचित अनुष्का शर्मा चा हा व्हिडिओ पाहिलाही असेल. दररोज ती एकाच प्रकारचे अन्न खात असल्याचं सांगते.चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यानही ठरवलेला तोच अन्नपदार्थ ती खात असल्याचं तिने सांगितलं.
View this post on Instagram
A post shared by Dr. Pal Manickam (@dr.pal.manickam)
डॉक्टरांच्या मते डायटचा हा प्रकार फायदेशीर आहे ?
डॉक्टर पाल मणिकम या डॉक्टरांनी एका समाज माध्यमावरील पोस्टमध्ये या डायटविषयी सांगितलं आहे. शरीरातील फॅट कमी करण्यासाठी मोनोट्रॅफिक डायट ही चांगली पद्धत असल्याचं ते सांगतात. या आहारामुळे रोज प्रमाणात खाल्लं जातं. यामुळे थकवा कमी होऊन बाहेरच्या चमचमीत तेलकट खाण्याच्या सवयी पासून तुम्हाला दूर राहता येते. ये डायट पद्धतीचा अवलंब करण्याआधी तुम्ही ठरवलेल्या पदार्थांमध्ये आवश्यक पोषण घटक आहेत का हे तपासून पाहण्याचा सल्ला पालम या गॅस्ट्रोअँटिऑलॉजिस्टने दिला आहे.
ही समस्या उद्भवू शकते
रोज एकाच प्रकारचा अन्न खाल्ल्याने पोषकत्व कार्यक्षमतेने शोषून घेता येतात असं म्हणतात. पण काहींना पचनाच्या समस्या ही होऊ शकतात. अस्वस्थ वाटण थकवा येणं सूज येणं अशी लक्षणेही असू शकतात.
डायटनं फायदाच पण..
या डाएटचा एक फायदा असा की एकाच प्रकारचे अन्न पचवण्यासाठी शरीराला त्याचीही सवय लागावी लागते. ह्यांना पचण्यासाठी शरीरात विशिष्ट एन्जायम तयार करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या डाएटचा पचनक्रिया सुलभ होण्यास फायदा होतो. पण तुम्ही निवडलेल्या अन्नपदार्थात सर्व पोषण तत्व आहेत का हे पाहणं तितकच गरजेचं असल्याचं तज्ञ सांगतात.
किती प्रमाणात खायचं हे ठरवा
या डायट मध्ये एकाच प्रकारचे अन्न खायचं असलं तरी ते किती प्रमाणात खातो यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. एकच पदार्थ आहे म्हणून अतिरेकी खाल्ल्यास शरीरात कॅलरीज वाढण्यास मदत होते आणि वजन कमी होण्याऐवजी वाढण्यास बळ मिळते असा तज्ञांचं म्हणणे आहे. शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. हे डायट म्हणजे पोषण असलेल्या एकच प्रकारचा अन्न सलग काही महिने खाणे.
http://dlvr.it/TD3gQ8
0 Comments
Tell me what is on your mind!
Emoji