Health : उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांनी पावसामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मान्सूनचे आगमन हे आनंददायी असतेच, पण इतर जीवाणूंनाही हा ऋतू खूप आवडतो. कारण या ऋतूत हवेतील आर्द्रता वाढल्याने हे सुक्ष्म जीवाणू सहज आणि मोठ्या प्रमाणात वाढतात. ज्यामुळे पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे बुरशी आणि इतर सूक्ष्मजंतू सहज वाढू लागतात. म्हणूनच, पावसाळ्यात हा बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब करणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी टिप्स जाणून घेऊया.
पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो
पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात गजकर्ण, खाज, खरूज यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. अशात, बुरशीजन्य संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही टिप्स जाणून घेऊया, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्ग टाळण्यास मदत होईल.
बुरशीजन्य संसर्ग कसा टाळायचा?
सैल कपडे घाला
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते, त्यामुळे भरपूर घाम येतो आणि अशा ओलसर ठिकाणी बुरशीची वाढ होते. म्हणून, सैल सुती कपडे घाला, ज्यामुळे तुम्हाला घाम कमी येतो आणि त्वचा लवकर कोरडी होते. अशा परिस्थितीत जाड कपडे घालणे टाळावे, जसे की जीन्स किंवा कमी घाम शोषणारे कपडे.
घाम पुसणे
जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर घामाने भिजलेले कपडे जास्त वेळ घालू नका, त्याऐवजी कपडे बदलत राहा. त्याचप्रमाणे शरीराच्या काही भागांना जसे अंडरआर्म्स, गुडघ्याच्या मागे आणि कोपरांना जास्त घाम येतो. त्यामुळे ही ठिकाणे वेळोवेळी पुसत राहा, जेणेकरून घामामुळे तेथे बुरशीची वाढ होऊ नये. आंघोळ करून लगेच कपडे बदला.
हात धुणे
कोणताही जंतू आपल्या हातातून सर्वाधिक पसरतो, कारण आपल्या हातांनी आपण शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागाला स्पर्श करतो. म्हणून, बाहेरून आल्यानंतर, कोणत्याही प्राण्याला स्पर्श केल्यानंतर किंवा साफसफाई वगैरे केल्यानंतर, आपले हात नक्कीच धुवा. यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होईल.
टॉवेल आणि चादरी बदला
आंघोळीनंतर किंवा बाहेरून आल्यानंतर आपले हात पाय टॉवेलने पुसतो. त्याचप्रमाणे झोपताना सोडलेला घाम आपल्या उशीवर आणि बेडशीटवर दिसतो. त्यामुळे बुरशीची वाढ होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमचे टॉवेल आणि चादरी नियमितपणे बदलणे महत्त्वाचे आहे.
खाजवू नका
जर तुम्हाला बुरशीजन्य संसर्ग झाला असेल तर त्या भागात खाजवू नका. यामुळे संसर्ग वाढू शकतो किंवा अधिक गंभीर स्वरूप येऊ शकते. त्यामुळे अजिबात खाजवू नका.
स्वत: औषधोपचार करू नका
बुरशीजन्य संसर्ग असल्यास, स्वतःहून औषध घेऊ नका. हे फक्त तात्पुरते आराम देते आणि काही दिवसात संसर्ग परत येऊ शकतो. त्यामुळे शरीरावर पुरळ किंवा खुणा दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
स्वच्छ अंतर्वस्त्रे घाला
आपल्या प्रायव्हेट पार्टलाही खूप घाम येतो. तसेच महिलांमध्ये योनीमार्गातून स्त्राव झाल्याने प्रायव्हेट पार्टमध्ये आर्द्रता वाढते. म्हणून, अंडरवेअर दररोज बदला आणि गरम पाण्यात पूर्णपणे स्वच्छ करा.
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो स्वत:लाही जपा, 'या' कारणांमुळे चाळीशीतच जातेय मासिक पाळी, तोटे जाणून घ्या..
" target="_self">
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
http://dlvr.it/T9D4cx
0 Comments
Tell me what is on your mind!
Emoji